← Back to Blog

आपल्यातलं reading culture तर बाबासाहेबांनीच रुजवलं आपल्यातलं reading culture तर बाबासाहेबांनीच रुजवलं

आपल्यातलं reading culture तर बाबासाहेबांनीच रुजवलं आपल्यातलं reading culture तर बाबासाहेबांनीच रुजवलं . प्रत्येक फोटोत , पुतळ्यात बाबासाहेबांना हातात पुस्तक घेऊनच आपण बघत आलोय . भारताच्या कोणत्याच iconic figure ला हे गाठता आलं नाही . बाबासाहेबांची इमेजच वाचक व अभ्यासक म्हणून एवढी बिंबवली की त्यांचा अनुयायी म्हणून घेणाऱ्याला पहिला प्रश्न तु किती वाचलं , काय वाचलं इथुन सुरु होतो . कोणत्याच राष्ट्रीय नेत्यांच्या अनुयायांना शिक्षण वाचणाची अट नाही जी बाबासाहेबांच्या अनुयायांना आहे . आणि हे प्रचंड सकारात्मक प्रेरणादायी आहे . करिअर तुम्ही काहीही निवडा पण आपल्या आई वडिलांकडून बाबासाहेबां सारखं शिक हे पहिलं ऐकवलं जातं . मानव मुक्तीच्या कल्पना व मानव मुक्तीची हर एक शक्यता ज्ञान , शिक्षण वाचणातुनच जाते , तसं ते सिद्ध ही आहे . भारतात reading culture pioneering करणारा म्हणून बाबासाहेबांना म्हटलं तरी चालेल इतकं त्यांनी तमाम लाखो लोकांना प्रवृत्त केलं . भारत स्वांतत्र्य झाला तरी शिक्षणाचं प्रमाण शोषित वर्गात आज जेवढं आहे तेवढं झालं नसतं जर बाबासाहेबांनी शिक्षणाला महत्त्व दिलं नसतं . भारत सरकारच्या प्रयत्नाविनाही साक्षरता , वाचनाला बुस्टर डोस शिका संघटित व्हा संघर्ष करा या स्लोगनने दिला तो शंभराच्या एका अंश इतकाही देता आला नसता . बाबासाहेबांचा वैयक्तिक ग्रंथ साठा ३० हजार + पुस्तकांचा होता , आपण तिशी पस्तीशी ओलांडुन १००० पर्यत मजल मारता दमछाक होतो . बाबासाहेबांच्या ६२ वर्षा नंतरही थोडे प्रिवेलज येऊनही आपण तो टप्पा पार करु शकलो नाही . ही आयकॉनिक फिगर किती लायक आहे यावरून लक्षात येतं . वाचनाचं औचित्य वाचन दिनापुरतं नसावं . रोज वाचावं खुप वेळ मिळत नसेल तर १० - २० - ३० पाने जी जेवढी शक्य ती वाचावीत .

Comments (0)

No comments yet. Be the first!

Leave a Comment

Related Posts

भीम जयंती काय माहोल होता तो !

बुद्ध आणि क्रांतीबा फुले !

बा भीमाच आपली काव्यरचना आहे बाबासाहेब खमके , प्रसंगावधान राखुन कठोरच होते पण कठोरतेच्या गर्भात दडलेले बाबासाहेब प्रचंड भावनिक होते , कितीदा वेगवेगळ्या प्रसंगात अश्रू ढाळले

एका आजी जवळ असलेली बाबासाहेबांची आठवण - भीम जयंती जूने लोक खुप भावनिक आहे बाबासाहेबासोबत