← Back to Blog

बुद्ध आणि क्रांतीबा फुले !

बुद्ध आणि क्रांतीबा फुले ! अंगुलीमाल ही बुद्धावर शस्र घेऊन आलेला , पण बुद्ध त्याला बुद्ध निशस्र असुनही भयभीत वाटला नाही , किंवा प्रतिकारासाठी सज्ज होतोय , सावधान होतोय असंही बुद्धात त्याला काही दिसलं नाही . आपल्याच खुंखारपणावर तेव्हा कदाचित त्यालाही थोडी शंका येऊन थोडा कोड्यात पडून शांत झाला असेल आणि बुद्धाच्या धीरगंभीर सुबोध वाणीने प्रभावित होऊन , प्रश्नोत्तरातुन चिंतन करत त्याला त्याचं माणुसपण गवसलं असेल . पुढे हाच खुखांर हिंसक अंगुलीमाल चरत भिक्खुवे चारिकम बहुजण हिताय बहुजन सुखाय उपदेशाने बौद्ध भिक्खू बनुन अर्हत ही झाला . असेच जोतीराव फुले यांच्या बाबतीत ही घडलं . मुली व अस्पृश्यांसाठी शाळा काढली , शिक्षणातुन फक्त अक्षर ओळख नाही तर समाजभान त्यांच्यात निर्माण करत असता त्यांच्या या कार्याला विरोध म्हणून बामणांनी दोन मारेकरी पाठवले . रामोशी रोडे आणि धोंडीराम कुंभार हे ते दोघे मारेकरी होते . पण जोतीराव फुले यांना चाहुल लागुन सावधान झाले झटापटीत जे जोतीराव फुले जे काही सांगू शकले त्यात या दोघांना ही त्याचं माणुसपण गवसलं . क्रांतीबा तसे धडधाकट आणि कुस्तीत शरीर बनवलेले होते . यांच्यातील संवादाने मारेकऱ्यांना पश्चात्ताप झाला , चुक लक्षात आली . जोतीराव फुलेनी बदलाची भावना घेतली नाही . या दोन्ही शरणार्थीना योग्य ते प्रबोधन करुन त्यांच्या कडुन उचित कार्य घडुन आणलं . हा रामोशी रोडे क्रांतीबाचा अंगरक्षक बनला , फुलेचे कार्य खड्या आवाजात गाऊ लागला . विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात त्यांची सुन सावित्रीबाई रोडे हिच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाचे अधिवेशन सुद्धा पार पडल्याचा उल्लेख आहे . दुसरे मारेकरी धोंडीराम कुंभार कुंभार सत्यशोधक समाजाचा आधारस्तंभ बनला . क्रांतीबाचे विचार समाजात पेरत होते . फुलेनी यांना काशीला विद्याभ्यासाठी काशीला पाठवले होते . याच धोंडीरामानी १२ फ्रेबुवारी १८८४ साली शृगांरी येथील शंकाराचार्याला वाद विवादात हारवले होते . असल्या भयाण काळात एखाद्या शुद्रांनी बामणाला शंकाराचार्याला वादविवादात हरवनं bramhins supremacy ला जोतीबा कडुन आव्हाण होतं . हा संदर्भ आज वाचताना तितका महत्वाचा वाटणार नाही पण १८८० काळ डोळ्या समोर ठेऊन लक्षात घ्या हे किती आव्हानात्मक होतं . जोतीबा लिखित " गुलामगिरी " हा ग्रंथ हा याच धोंडीरामाला कदाचित डोळ्यासमोर लिहला असावा . ( शिक्षणात living experience कसं वापरायचं यात जोतिबा माहीर होते . यावर सविस्तर लिहिल नंतर ) बुद्ध आणि क्रांतीबा फुले यांच्यातील हे जीवण प्रसंग किती साम्य दर्शवणारे आणि सारखेच प्रेरणादायी आहे .

Comments (0)

No comments yet. Be the first!

Leave a Comment

Related Posts

भीम जयंती काय माहोल होता तो !

आपल्यातलं reading culture तर बाबासाहेबांनीच रुजवलं आपल्यातलं reading culture तर बाबासाहेबांनीच रुजवलं

बा भीमाच आपली काव्यरचना आहे बाबासाहेब खमके , प्रसंगावधान राखुन कठोरच होते पण कठोरतेच्या गर्भात दडलेले बाबासाहेब प्रचंड भावनिक होते , कितीदा वेगवेगळ्या प्रसंगात अश्रू ढाळले

एका आजी जवळ असलेली बाबासाहेबांची आठवण - भीम जयंती जूने लोक खुप भावनिक आहे बाबासाहेबासोबत