बा भीमाच आपली काव्यरचना आहे बाबासाहेब खमके , प्रसंगावधान राखुन कठोरच होते पण कठोरतेच्या गर्भात दडलेले बाबासाहेब प्रचंड भावनिक होते , कितीदा वेगवेगळ्या प्रसंगात अश्रू ढाळले . हे अगदीच त्यांच्या सामान्यपणाचं लक्षण होतं . अशा या भावनिकता जपणाऱ्या आमच्या बाबासाहेबांनी कविता लिहली असती तर कशी लिहली असती ? हृदयद्रावक आशय असता तर कसा असता ? दुःखाला कसं मांडलं असतं ? कसं चितलं असतं त्या दुःखावर सुखाची आशेची कल्पना ? अर्थातच या जर तरला अर्थ नाही . राऊंड टेबल कॉन्फरन्सला जात असताना त्यांच्या सहकारी संपादक मित्राला एका पत्रात याची बाबासाहेब खंत व्यक्त करतात की त्यांना कठोर समजलं जातं आणि त्यांना काव्य मन नाही म्हटलं जातं पण माझं पुर्ण जीवणच बघितलं तर काव्यच होईल असा आशय त्या पत्रात व्यक्त करतात . भारतात बाबासाहेब एकमेव असतील ज्यांच्यावर सर्वात जास्त भारतातील जवळपास सर्वच भाषेत गाणी व कविता लिहली गेली असेल . हा मोठा सांस्कृतिक विक्रमच आहे जो अजुन जाहीर व्हायचा बाकी आहे . पण हे काही असो , एक ना एक दिवस कविता व गीतांची सर्व भाषेत नोंद झालेले statistics समोर आणतीलच आपले मुले तो आश्चर्यकारक प्रसंग नक्कीच असेलच पण काव्य स्वरूपात न मांडताही बाबासाहेबांचे काही लिखाण व त्यांचे पत्रे मला कारूण्य कविताच वाटतात . Waiting For A Visa असो की मित्र शाहु महाराजांना लिहलेले पत्र , किंवा आपले लिखित पुस्तकात संत रोहिदास , फुले , रमाई मैत्रीण फॅनी यांना सगळ्यांना पुस्तकात लिहलेली अर्पन पत्रिका असो . सगळेच अगदी भावनिक काव्य वाटत आली मला . Waiting For A Visa तर दीर्घ काव्य मनाच्या अकांताला दिलेला आवाज आहे . हे पुस्तक बाबासाहेबांनी १९३६ मधे लिहुन प्रकाशित केलं आणि बालपणीच्या जातीयतेच्या आठवणी कोवळ्या मनावर कशा जिवंत राहुन गेल्या हे दाखवलं . त्यात जो प्रसंग वर्णन केला बाबासाहेबांनी की कित्येक विनवण्या व तिप्पट भाडे देऊन राजी केलेला गाडीवान , विटाळ होऊ नये म्हणून गाडीवान गाडीच्या खाली चालणे , बैलगाडी चालते , गाडीवानाने जातीचा केलेला उद्धार , भीती वाटेल असं त्याचं वागणं बोलणं , दोघे भाऊ व भाचा आपसात एकमेकांना हिंमत देत आहे , पुर्ण ओसडलेला चोहोबाजुंचा अंधार .... काय चाललं असेल तेव्हा त्या संवेदनशील मनात ? कशी असेल तेव्हा विचार प्रक्रिया बाबासाहेबांची त्या बाल मनात ?... आशिया ते अमेरिका , ऑस्ट्रेलिया ते युरोपातील मोठ्या विद्यापीठात आदर्श म्हणून statue उभारले जाईल हे त्या कोवळ्या मनाला आलं ही नसेल ना ? पण हीच ती त्यांच्या जीवणातुन भावनिक जीवणातुन शब्दहीन साकारलेली खरी कविता आणि , भावनिक काव्य , एक दर्प आहे . हे शुन्यातून साकारलेलं विश्व त्यांनी आपल्यासाठी बनवलं " तोच आपली कविता " आहे , आपला बा भीमाच आपली काव्यरचना आहे . ती कितीही व्यस्त करा सरता सरत नाही , सरणार ही नाही !!
बा भीमाच आपली काव्यरचना आहे बाबासाहेब खमके , प्रसंगावधान राखुन कठोरच होते पण कठोरतेच्या गर्भात दडलेले बाबासाहेब प्रचंड भावनिक होते , कितीदा वेगवेगळ्या प्रसंगात अश्रू ढाळले
Comments (0)
No comments yet. Be the first!