★★★★★
जयभीम सर , पुस्तक प्राप्त झाले . संकल्पना अतिशय मार्मिक आहे . आंबेडकरी साहित्यात हा नवीन प्रयोग आहे . तो हळुहळू रूजेल . त्याची सुरूवात तुम्ही केली , ही आंबेडकरी साहित्यातील विशेष नोंद ठरेल . उद्याला आंबेडकरी साहित्यातील “ कॉमिक्स ” साहित्याचा अभ्यास करतांना तुम्हाला टाळून पुढे जाणे शक्य नाही . या पुस्तकाचा प्रचार प्रत्येक शाळेत झाला पाहिजे . शाळेतील प्रत्येक ग्रंथालयात कमीत कमी दहा दहा प्रती तरी असल्या पाहिजे . कारण हा राष्ट्रीय विषय आहे . शालेय जीवनात विद्यार्थ्यांना फुले दाम्पत्याचे आणि शिक्षणाचे महत्व विषद करणारा हा अभिनव प्रयोग आहे . शासनातर्फे या पुस्तकाचा गौरव व्हावा , एवढे महत्वपूर्ण पुस्तक आहे . “ कॉमिक्स ” विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात शिरणारे माध्यम आहे . या पुस्तकाचे निर्मितीमूल्य अतिशय सुंदर आहे . त्याचा पेपर , प्रिटिंग , कव्हर अतिशय उच्च दर्जाचे आहे . कव्हर वरील फोटो आणि आत लिखित झालेला आषय एका कादंबरीचा आणि वैचारिक ग्रंथाला खाद्य पुरविणारा आहे . भाषण आणि लेखन करणाऱ्या लेखकांना रेडिमेड मुद्दे पुरविणारा आहे . आतिल चित्र आणि त्यासंबंधीत लेखन ही कसलेल्या लेखकाची साक्ष देते . सगळ्याच वयातील व्यक्तींना आवडेल , असे सुबक आणि सुंदर पुस्तक आहे . पुढील लेखनास अनेक सदिच्छा .
★★★★★
# क्रांतीज्योती_सावित्रीमाई ! जिने आम्हा स्त्रीवर्गाचा उद्धार केला ... जिच्या कार्यामुळेच आजची स्त्री मोठ मोठ्या हुद्द्यावर वावरताना दिसते ... ज्याकाळी शोषित पीडित वर्गाला शिक्षणापासून वंचित ठेवलं जात होत .. त्याकाळी तुम्हा-आम्हासाठी जी समतेचा ज्वलंत आवाज बनून उभी राहिल ी , आणि सुरू केली जिने नवी क्रांती !!! ती होती # क्रांतिज्योती_सावित्रीमाई_जोतीराव_फुले .... ही क्रांती दिसते तितकी सोपी नव्हती ... तिने पत्करलेला मार्ग वाटतो तितका सोपा नव्हता ; रोजचा त्रा स , रोष आणि संघर्ष किती आणि कसा सहन केला ; ह्याचा विचार करून ही अंगावर काटा उभा राहतो ... सदोदित होणारा अपमान दगड फेक , शेन फेक कसं आणि किती सहन कराव एखाद्यानं !!!. तरीही न डगमकता तिचं ध्येय तिने चालू ठेवलं . इतरांना प्रतिक्रिया देण्याहून आपल्या कार्यातून ते दाखवून दिलं . तिचे कष् ट , तिचा संघर्ष , आज वाचतानाही मन सुन्न झालं .... तिने जर क्रांतीची बीजे पेरली नसती तर आज आम्ही कुठे असतो ???...: कदाचित परत एकदा चूल आणि मूल याच संकल्पनेत अडकून पडलो असतो ... तू होती म्हणून आम्ही स्वाभिमानाने जगतोय . तुझे उपकार कसे विसरावेत ??? पण वाईट ही एका गोष्टीच वाटत तू जिच्या पायातील बेड्या तोडून पंखांना बळ दिलंस आज तिचं कुठेतरी सत्यवानाची सावित्री डोळ्यासमोर ठेऊन वडाला पुजताना दिसते ... आणि हेच चित्र बदलण्यासाठी , आजची लहानगी पिढी आणि उद्याची येणारी नवी पिढी घडावी . त्यांच्यापुढे ही महान आईरुपी साऊ माई पोचलीच पाहिजे . तिची समतावादी चळवळ कायम जिवंत राहावी . आणि यासाठीच लहान मुलामुलींना कळेल , त्यांना उमजेल , अशा साध्या सोप्या शब्दात कॉमिक बुक स्वरूपात सावित्रीमाई मांडण्याचं काम # राहुलजी पगारे सर * करत आहात त्यासाठी तुमचे मनापासून आभार !!! शब्दरचना , मांडणी , प्रसंगाप्रमाणे चित्र अगदी योग्य रित्या पुस्तकांची छपाई आहे .. ह्यामुळे मुलांना सावित्रीमाई समजून घेणं अजूनच सोप जाईल . अशा अनेक विषयांवर या स्वरूपात पुस्तक प्रकाशित व्हावीत जेणे करून चळवळ जागी राहील .... आणि त्यासाठी पगारे सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!! तुम्ही जे मुलामुलींना घडवण्याचं कार्य हाती घेतलेत ते असेच कायम सुरू ठेवावे ... आणि लवकरच याचा दुसरा ही अंक प्रकाशित करावा ... मी आवर्जून सांगेन की हे कॉमिक बुक आपल्या जवळील लहान मुलांना नक्की द्यावं भेटवस्तू स्वरूपात इतर काही देण्याहून हे पुस्तकं देणं खूप उपयुक्त आहे . नक्की खरेदी करा ...
★★★★★
करीता , स्वत:च्या घरच्या लहान लेकरांकरीता तर हि comics खरेदी करावीच पण लहान मुलांना gift द्यायला हे एक चांगलं option आता आपल्यापुढे आहे ...!!! सावित्रीआईचा , ज्योतिबाचा पुर्वइतिहास , लहानपणीचे किस्से , ज्योतिबाचं शिक्षण बंद झाल्यावर पुन्हा सुरू व्हावं म्हणून सावित्रीआईचे प्रयत्न , वयाच्या 21 व्या , 17 व्या वर्षी पहिली शाळा , शाळा चालविण्याकरीता घेतलेले कष्ट , जीवाचा आटापिटा आणि संघर्ष , सावित्रीआई नुसतीच पहीली शिक्षिका झाली नाही तर त्या well trained and skillful शिक्षिका होत्या , शाळा चालवतांना त्यांचं management, त्याकरीता लागणारी training सगळं सगळं वाचतांना मन भारावून जातं ... शाळा सुरू झाल्यानंतर ब्राम्हणांचा होणारा विरोध , एका page वर फक्त चित्राच्या सहाय्याने क्रांती प्रतिक्रांतीच्या रूपात बघणे फार वेगळा अनुभव आहे त्यामुळे चित्रांकन करण्याऱ्या व्यक्तीचं हि अभिनंदन , पुर्ण comics भर चित्रं बोलतातं ... Earn while learn हा concept आपल्याकडे काही नवीन नाही तर ज्योतीबा साऊ आईने विद्यार्थ्यांची सामाजिक , आर्थिक स्थिती ओळखून त्यांना पैशांचीही सोय व्हावी म्हणून व्यवसायाभिमुक , औद्योगिक शिक्षण हि शाळेत सुरू केले यावरून त्यांची psychology किती strong होती याचा हि प्रत्यय येतो ... सरतेशेवटी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद सर , पुनश्च शुभेच्छा ...